
कामाचे तास
सोमवार - शुक्रवार:- 9.45 AM – 5.45 PM
शनिवार - रविवार :- सुट्टी
धारणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक नगर पंचायत आणि जनगणना शहर आहे . २०११ च्या जनगणनेनुसार, धारणी तालुक्याची लोकसंख्या १,८७,६६५ आहे, त्यापैकी ९३,८९८ पुरुष तर ९०,७६७ महिला आहेत. हे धारणी तहसीलचे मुख्यालय आहे आणि परटवाडा ते बुरहानपूर या टेकड्यांमधून जाणाऱ्या हाय रोडचे टर्मिनस बनवते . ते परटवाडा पासून ९७ किमी (६० मैल) आणि अमरावती पासून १४८ किमी (९२ मैल) अंतरावर आहे .
धारणी तालुकाहा सातपुडा पर्वतरागेत वसलेला तालुका आहे.या तालुक्यचे सिमाह्या मध्यप्रदेश राज्य व महाराष्ट्र अकोला, या जिल्हयाना लागुन आहेत. धारणी तालुक्यता प्रमुख पिके हि मका, ज्वारी , सोयाबीन, उस हे आहेत.
सोमवार - शुक्रवार:- 9.45 AM – 5.45 PM
शनिवार - रविवार :- सुट्टी
०७२२६२ २२४२२४
वरील तात्काळ नंबर वर संपर्क करा
सन 2011 नुसार तालुक्याची लोकसंख्या
एकुण लोकसंख्या :- १,८७,६६५
एकुण पुरूष :- ९३,८९८
एकुण स्त्री :- ९०,७६७
तालुक्यात विशेषत: अनुसुचीत जमातीचे वास्तव्य जास्त् आहे. यामध्ये कोरकू, मोगींया, रहट्या आणि गोंड या उप जाती आहेत. त्याच बरोबर खुप कमी प्रमाणात मुस्लीम, कलाल, गवळी, बलई, वजारी कुंटूबाचे वास्तव्य आहे. यासर्वाची विशिष्ट बोली भाषा हिंदी, मराठी, कोरकु, गोंडी भाषा आहेत.
अनु. जमातीचे लोक ही जंगलामध्ये छोट्या छोटया वस्तयात राहतात. त्यांना ढाणा असे म्हणतात. यांच्या घरांची रचना ही उतरत्या छपराची शेण माती यांनी लेपन केलेले घराच्या सभोवताली कुपंण केलेले आढळुन येते. कोरकु भाषेत अंगणाला बाडी असे म्हणतात. यांचा प्रमुख उदर निर्वाह मत्सय व्यवसाय शिकार करणे यावर अवंबुन आहेत. यांचे प्रमुख अन्न भाता सोबत नागली वरई व गहु यासोबतच गहु आणि भाजीपाला, फळे यांचे उत्पादन करुन अन्नामध्ये त्याचा उपयोग करतात.
कोरकु जामातीच्या महिलाहया साडी आणि फडकी परिधान करतात. साडीला दोन भागात कापुन वरच्या भागाला फडकी आणि दुसरा कापलेला भाग कमरेपासुन खालच्या भागाला परिधान करतात. महिला विशेष्त: शेती साभाळुन घरकाम करतात तर पुरूष शेती सह उदनिर्वाह करीता दैनदिन मजुरीचे काम करतात.
कोरकु समाजा मध्ये आपसा मध्ये लग्न ठरवल्या जाते. बरेच लग्न हे कमी वयात केली जातात. लग्ना अगोदर सगाइचा कार्यक्रम केला जातो. मुलगा व मुलीना अटी व शर्तीना अधिन राहुन सोबत राहण्याची परवानगी दिली जाते. लग्न समारभाचा कार्यक्रम हा तीन ते चार दिवसाचा असतो. या जमाती मध्ये पुर्नविवाह व घटस्फोटास मान्यता आहे. मृत्यु पावलेल्या व्यंतीना जमीनी दफन करणे व दहण केले जाते. या जमातीची विशेष पंरपरा असुन लग्न, मृत्यु व सन उत्सव यामध्ये त्याचे जतन करतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्थित, सेमाडोह ग्रामीण जीवनाची झलक दाखवते आणि वन विभागाच्या निवासस्थानांसह जंगल कॅम्पिंगसाठी एक ...
१९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत अधिसूचित झालेल्या भारतातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट हे एक होते. हे महारा...
गाविलगडला एक समृद्ध आणि ऐतिहासिक भूतकाळ आहे. जुनी म्हण होती, ज्याने गाविलगड ताब्यात ठेवला, त्याने बेरार ताब्यात ठेवला. बहामन...
गुगामल राष्ट्रीय उद्यान हे एक भारतीय राष्ट्रीय उद्यान आहे जे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सात संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे....